दिनविशेष
जानेवारी महिना दिनविशेष
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ जानेवारी | 1. WTO ची स्थापना 2. निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले. १७८५: डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता. १८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली. १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला. १८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले. १८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. |
२ जानेवारी | २०१५ मध्ये भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन. |
३ जानेवारी | १९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या. |
४ जानेवारी | १९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला. १९५९: रशियाचे लुना-१ हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले. २०१०: बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले. १६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म. |
५ जानेवारी | १८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित. १९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले. १९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली. १९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला. |
६ जानेवारी | पत्रकार दिन १९५९: भारतीय क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांचा जन्म. १८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले. |
७ जानेवारी | १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. १९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले. |
८ जानेवारी | १९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली. २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. |
९ जानेवारी | जागतिक अनिवासी भारतीय दिन १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले. १९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले. |
१० जानेवारी | जागतिक हास्य दिन १८७०: मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. १९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला. १९००: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३) |
११ जानेवारी | २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म. लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी |
१२ जानेवारी | राष्ट्रीय युवा दिवस आणि स्वामी विवेकानंद जयंती २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना. १५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४) |
१३ जानेवारी | १९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले. १९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली. |
१४ जानेवारी | भूगोल दिवस तसेच मकर संक्रात १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. १९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. |
१५ जानेवारी | भारतीय सेना दिवस १७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले. १९२१: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७) १९२६: भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४) |
१६ जानेवारी | संभाजीराजे राज्याभिषेक दिन १६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. १९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द. १९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले. २००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण. |
१७ जानेवारी | ११ ते १७ जानेवारी रास्ता सुरक्षा दिवस १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली. |
१८ जानेवारी | १९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. १९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. २००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले. |
१९ जानेवारी | १९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन. १९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला. |
२० जानेवारी | १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. |
२१ जानेवारी | मेघालय ,मणिपूर आणि त्रिपुरा दिवस १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. १९७२: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. |
२२ जानेवारी | १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले. २००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली. २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली. |
२३ जानेवारी | नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती |
२४ जानेवारी | १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली. १९६६: भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला. १९५०: भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली |
२५ जानेवारी | राष्ट्रीय मतदार दिवस १९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले. १८८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान. २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न प्रदान. |
२६ जानेवारी | प्रजासत्ताक दिन १८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली. १९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले. १९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू. |
२७ जानेवारी | १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. म्हणजेच बालभारती होय. |
२८ जानेवारी | लाला लजपत राय जयंती १८६५: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८) |
२९ जानेवारी | १२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १२९७) |
३० जानेवारी | जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन ,महात्मा गांधी पुण्यतिथी ,शाहिद दिवस |
३१ जानेवारी | १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात. १९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली. १९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. १९९२: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना |
फेब्रुवारी महिना दिनविशेष | February Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ फेब्रुवारी | २०१३: जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली. जागतिक सूर्यनमस्कार दिन |
२ फेब्रुवारी | जागतिक पाणथळ भूमी दिन |
३ फेब्रुवारी | १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली. १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला |
४ फेब्रुवारी | २०००: विश्व कर्करोग दिन |
५ फेब्रुवारी | १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. २००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली. |
६ फेब्रुवारी | १९३२: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. |
७ फेब्रुवारी | १८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले. १९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. |
८ फेब्रुवारी | १७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला. १९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले. १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले. २०१५: नीती आयोगाची पहिली बैठक |
९ फेब्रुवारी | १९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली. १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू. १९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. |
१० फेब्रुवारी | १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली. १९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना. १९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली. |
११ फेब्रुवारी | १८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला. १८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना. १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. |
१२ फेब्रुवारी | जागतिक आरोग्य दिन १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. |
१३ फेब्रुवारी | २००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. |
१४ फेब्रुवारी | वेलेन्टाइन डे १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना. १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना |
१५ फेब्रुवारी | १७७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली. |
१६ फेब्रुवारी | दादासाहेब फाळके पुण्यदिन १७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले. |
१७ फेब्रुवारी | १८८१: क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन. १९८६: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९५) |
१८ फेब्रुवारी | १९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. २००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. |
१९ फेब्रुवारी | छत्रपती शिवाजी महाराज जयंती २००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. |
२० फेब्रुवारी | जागतिक सामाजिक न्याय दिन १९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले. २०१४: तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले. |
२१ फेब्रुवारी | आंतराष्ट्रीय मातृभाषा दिन १९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला. |
२२ फेब्रुवारी | १९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. |
२३ फेब्रुवारी | १९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना. १९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले. १९९६: कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला. |
२४ फेब्रुवारी | जागतिक मुद्रण दिन १६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म. १९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली. २०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला. |
२५ फेब्रुवारी | १९९६: स्वर्गदारा तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. १५९९: संत एकनाथ यांचे निधन. |
२६ फेब्रुवारी | १९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान. |
२७ फेब्रुवारी | मराठी भाषा दिन जागतिक स्वयं सेवी संस्था दिन |
२८ फेब्रुवारी | राष्ट्रीय विज्ञान दिवस |
Read More:- Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
मार्च महिना दिनविशेष | March Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ मार्च | जागतिक नागरी संरक्षण दिन १९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली. १९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली. १९४८: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली. |
२ मार्च | १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले. |
३ मार्च | २०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. १९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. १९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले. १९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले. १९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू. |
४ मार्च | १९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. २००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले. |
५ मार्च | १९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले. २०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला. |
६ मार्च | दंतवैद्य दिन २००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरु झाला. |
७ मार्च | १९५५: चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म. १६४७: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन. |
८ मार्च | जागतिक महिला दिन (१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.) १९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले. |
९ मार्च | १६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास. |
१० मार्च | १९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली. |
११ मार्च | १८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली. १८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली. |
१२ मार्च | १८९४: कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात. १९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला. १९३०: महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली. |
१३ मार्च | १९९७: मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली. १९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले. २००३: मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले. |
१४ मार्च | १९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली. |
१५ मार्च | जागतिक ग्राहक हक्क दिन १५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला. १८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले. १९१९: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले. १९५०: नियोजन आयोगाची स्थापना |
१६ मार्च | १९३६: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. १९१९: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला. १९५५: राष्ट्रीय लसीकरण दिवस २००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला. |
१७ मार्च | १९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली. |
१८ मार्च | १९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास. १९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला. |
१९ मार्च | १८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. |
२० मार्च | जागतिक चिमणी दिन आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन १९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला. |
२१ मार्च | जागतिक कविता दिन जागतिक कठपुतळी दिन आंतरराष्ट्रीय रंग दिन १९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली. २००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना. २०१२: आंतरराष्ट्रीय वन दिन |
२२ मार्च | जागतिक जल दिन १९८०: PETA ची स्थापना |
२३ मार्च | जागतिक हवामान दिन १९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. १९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत. १९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले. |
२४ मार्च | जागतिक क्षय रोग दिन १८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली. १९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले. |
२५ मार्च | १८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले. १८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला. २०१३: मणिपूर आणि मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना |
२६ मार्च | १९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली. २०१३: त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना. १९७१: बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन |
२७ मार्च | जागतिक रंगमंच दिन १९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान. |
२८ मार्च | १७३६: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला. १९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली. १९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. १९८८: ६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले |
२९ मार्च | १९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना. १९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली. १९४२: क्रिप्स योजना जाहीर |
३० मार्च | १९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली. |
३१ मार्च | १८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. १९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या. |
Read More:- Ghanmul PDF Download (Cube Root) | घन और घनमूल की सारी जानकारी
एप्रिल महिना दिनविशेष | April Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ एप्रिल | एप्रिल फूल दिन १८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली. १८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले. १९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. १९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. १९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली. १९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. १९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान. २००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली. |
२ एप्रिल | जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूक दिन १८७०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. १८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. |
३ एप्रिल | छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली. २०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. |
४ एप्रिल | १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. |
५ एप्रिल | २०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. २०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन. १९९९: राष्ट्रीय समुद्री दिवस भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं. |
६ एप्रिल | १९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. १९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. |
७ एप्रिल | जागतिक आरोग्य दिन १८७५: आर्य समाजाची स्थापना झाली. १९४८: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली. |
८ एप्रिल | आंतरराष्ट्रीय रोमानी दिवस १९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली. १९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला. १९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला. १८५७: मंगल पांडे ह्यांना फाशी झाली |
९ एप्रिल | जलसंधारण दिन १९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले. |
१० एप्रिल | १९१७: गांधी चंपारण्याला आगमन |
११ एप्रिल | जागतिक पार्किन्सन दिन १९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. १९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. |
१२ एप्रिल | १९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. १९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले. १९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला. १९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. |
१३ एप्रिल | जालियनवाला बाग स्मृतिदिन १६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले. |
१४ एप्रिल | डॉ , बाबासाहेब आंबेडकर जयंती |
१५ एप्रिल | जागतिक कला दिन जागतिक सांस्कृतिक दिन १८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली. १९९४: भारताची इंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी झाली |
१६ एप्रिल | जागतिक ध्वनी दिन १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला. १८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली. |
१७ एप्रिल | जागतिक हिमोफेलिया दिन १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली. |
१८ एप्रिल | आंतरराष्ट्रीय स्मारक व जागा दिन १८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली. १८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली. १९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले. १९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली. |
१९ एप्रिल | १९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला. |
२० एप्रिल | १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले. |
२१ एप्रिल | भारतीय नागरी सेवा दिन १९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली. |
२२ एप्रिल | जागतिक पृथ्वी दिन |
२३ एप्रिल | जागतिक पुस्तक दिन इंग्रजी भाषा दिन |
२४ एप्रिल | भारतीय पंचायती राज दिन |
२५ एप्रिल | जागतिक मलेरिया दिन |
२६ एप्रिल | जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन |
२७ एप्रिल | १८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला. |
२८ एप्रिल | १९१६: होम रुल लीगची स्थापना झाली. |
२९ एप्रिल | आंतरराष्ट्रीय नृत्य दिन |
३० एप्रिल | आंतरराष्ट्रीय जॅझ संगीत दिन १९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला. १९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले. |
Read More:- Hindi Barakhadi PDF Download (Chart, Image) | हिन्दी बारहखड़ी की सारी जानकारी पीडीएफ डाउनलोड
मे महिना दिनविशेष | May Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ मे | जागतिक कामगार दिन महाराष्ट्र दिन गुजरात दिन १८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली. १९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली. १९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना. |
२ मे | १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला. १९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले. |
३ मे | जागतिक पत्रकारिता स्वतत्र दिन १९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला. १९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली. १९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. |
४ मे | आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन १८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले. १९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली. १९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. |
५ मे | युरोप दिन १९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. |
६ मे | आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. |
७ मे | १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रेन सुरू झाली. १९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली. १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान |
८ मे | आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन १८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी. १९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. १९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना. |
९ मे | १८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्या ट्राम सुरू झाल्या. |
१० मे | १८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता. १९९३: संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. |
११ मे | आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन १८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली. |
१२ मे | आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन १९५२: प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. १९९८: केन्द्र सरकारी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय. २०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. |
१३ मे | १९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले. १९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न. १९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले. १९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली. २०००: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला. |
१४ मे | १९६०: एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली. |
१५ मे | भारतीय वृक्ष दिन |
१६ मे | १८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी. १९७५: सिक्कीम भारतात विलीन झाले. १९९६: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. |
१७ मे | जागतिक उच्च रक्तदाब दिन जागतिक माहिती संस्था दिन १८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला. १९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय. १९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले. |
१८ मे | आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन १९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला. १९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. १९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. १९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. |
१९ मे | १९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९) १२९७: संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली. |
२० मे | जागतिक हवामान विज्ञान दिन १९३२: स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८) |
२१ मे | १९९१: पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली. १९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले. |
२२ मे | जागतिक जैव विविधता दिन १९८७: मेरठ जिल्ह्यात हाशिमपूरा हत्याकांड झाले. २००४: भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली. |
२३ मे | १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले. |
२४ मे | २०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण. |
२५ मे | आफ्रिकन मुक्ती दिन |
२६ मे | १९८६: युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला. १९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले. २०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. |
२७ मे | १९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना. १९५१: मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले. १९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. |
२८ मे | १९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली. १९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली. |
२९ मे | जागतिक पचन स्वस्थ दिन भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १९०२) |
३० मे | १९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात. १९८७: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. १९९३: पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. |
३१ मे | जागतिक तंबाखू विरोधी दिन १९१०: दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले. १९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना. |
Read More:- All Best Marathi Bodh Katha PDF Download | मराठी बोध कथा त्यांच्या तात्पर्य सह पीडीएफ डाउनलोड करा
जून महिना दिनविशेष | June Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ जून | जागतिक दूध दिन १९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली. १९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले. १९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली. १९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली. |
२ जून | इटली प्रजासत्ताक दिन २०१४: तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले. |
३ जून | १९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. १९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली. |
४ जून | १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. १९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. |
५ जून | जागतिक पर्यावरण दिन २००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले. |
६ जून | १६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. २००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली. |
७ जून | १८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. २००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना. |
८ जून | जागतिक ब्रेन ट्युमर दिन जागतिक महासागर दिन (१९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला) |
९ जून | १९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले. १९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण. |
१० जून | महाराष्ट्र राज्य दृष्टी दिन |
११ जून | १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. १९९७: सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल. |
१२ जून | जागतिक बालकामगार निषेध १९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली. १९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी. |
१३ जून | १९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली. |
१४ जून | जागतिक रक्तदाता दिन १८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. १९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर. |
१५ जून | अंतराष्ट्रीय हवा दिन १८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. १९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली. |
१६ जून | १९०३: फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली. १९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका. २०१०: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला. |
१७ जून | जागतिक दुष्काळ विरोधी दिन १९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला. |
१८ जून | १९८३: अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत. |
१९ जून | जागतिक सांत्वन दिन १९६६: शिवसेनेची स्थापना. |
२० जून | जागतिक शरणार्थी दिन १९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली. १९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. १९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली. |
२१ जून | आंतरराष्ट्रीय योग्य दिन १९४९: राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना. १९९१: पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान. |
२२ जून | १७५७: प्लासीची लढाई सुरू झाली. १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. १९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना ३० टक्के आरक्षण. |
२३ जून | आंतरराष्ट्रीय विधवा दिन सयुंक्त राष्ट्र लोकसेवा दिन १९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु. |
२४ जून | १४४१: इटन कॉलेजची स्थापना. १९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती. २००१: आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली. |
२५ जून | जागतिक कोड निवारण दिन १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला. १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. |
२६ जून | जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन १८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले. १९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले. १९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले. |
२७ जून | १९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान. |
२८ जून | १९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. |
२९ जून | २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर. २००१: ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर. |
३० जून | आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन २००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला. |
Read More:- Best Vanrakshak Book PDF Download | वन रक्षक भरती च्या तयारी साठी सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या
जुलै महिना दिनविशेष | July Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ जुलै | कृषी दिन १८७४: पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली. १८८१: जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला. १९०९: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली. १९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते. १९४९: त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले. २००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली. |
२ जुलै | जागतिक यूएफओ दिन १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले. १९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या. २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला. |
३ जुलै | १८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली. १८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला. १९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता. |
४ जुलै | १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला. १९४७: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला. |
५ जुलै | १९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. १९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले. १९७५: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले. १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर. २००४: FRBM कायदा २००३ अमलात. २०१७: राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात. |
६ जुलै | १७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले. १८८५: लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली. १९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना. १९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला. |
७ जुलै | १८५४: कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली. १९१०: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना. १८५४: बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना. |
८ जुलै | १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली. २००६: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. २०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली. |
९ जुलै | १८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. १९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला. |
१० जुलै | मातृ सुरक्षा दिन १९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली. १९२५: तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली. १९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले. २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर |
११ जुलै | जागतिक लोकसंख्या दिन १९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली. १९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला. २००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले. |
१२ जुलै | १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला. १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली. १९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले. १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान. २००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान. |
१३ जुलै | १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी. २०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी. |
१४ जुलै | २०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली. |
१५ जुलै | १९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली. १९२७: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. १९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ. १९९६: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला. २०१४: जागतिक युवा कौशल्य दिन |
१६ जुलै | १९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. |
१७ जुलै | आंतरराष्ट्रीय न्याय दिन १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी. |
१८ जुलै | नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन १८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली. १८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना. १९८०: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. |
१९ जुलै | १९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. |
२० जुलै | आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले. २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर. |
२१ जुलै | १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. |
२२ जुलै | १९४७: राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार. |
२३ जुलै | वनसंवर्धन दिन १९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले. १९८६: हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात. |
२४ जुलै | १९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. १९९७: बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. |
२५ जुलै | २००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या. |
२६ जुलै | कारगिल विजय दिवस १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर. १९०२: कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद. |
२७ जुलै | २०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. |
२८ जुलै | जागतिक हेपटायटिस दिन २००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान. |
२९ जुलै | विषमताविरोधी दिन आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन १९८७: भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या. |
३० जुलै | २०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले. २००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. २०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार. |
३१ जुलै | १६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला. २००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान. |
Read More:- Nibandh In Marathi PDF Download | निबंध मराठी मध्ये ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या
ऑगस्ट महिना दिनविशेष | August Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ ऑगस्ट | लोकमान्य टिळक पुण्यदिन १९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली. १९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. २००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. १९२०: असहकार चळवळ प्रारंभ |
२ ऑगस्ट | १९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला. १९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला. |
३ ऑगस्ट | १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली. २००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. |
४ ऑगस्ट | १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली. |
५ ऑगस्ट | १९९४: इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान. |
६ ऑगस्ट | जागतिक अण्वस्त्र विरोधी दिन १९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान. १९५२: राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना. |
७ ऑगस्ट | १९४७: मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली. २०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले. |
८ ऑगस्ट | भारतीय स्वातंत्र्य चळवळ क्रांती दिन १५०९: कृष्णदेव राय हे विजयनगर चे सम्राट बनले. १९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली. १९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले. १९६७: आसियान ची स्थापना |
९ ऑगस्ट | जागतिक आदिवासी दिन १९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला. १९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन. १९४२: भारत छोडो दिन |
१० ऑगस्ट | आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन १९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर. |
११ ऑगस्ट | १९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. २०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले. |
१२ ऑगस्ट | आंतरराष्ट्रीय हत्ती दिन आंतरराष्ट्रीय युवा दिन १९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली. |
१३ ऑगस्ट | आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन १९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. |
१४ ऑगस्ट | १८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना. १८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. १९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली. १९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक. २०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.= |
१५ ऑगस्ट | भारतीय स्वातंत्र्य दिन संस्कृत दिन १८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली. १९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. १९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली. १९६९: ISRO ची स्थापना |
१६ ऑगस्ट | १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले. |
१७ ऑगस्ट | २००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले. १९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली. |
१८ ऑगस्ट | १९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई. २००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला. |
१९ ऑगस्ट | जागतिक मच्छर दिन भारतीय अक्षय ऊर्जा दिन जागतिक छायाचित्रण दिन |
२० ऑगस्ट | १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. २००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले. |
२१ ऑगस्ट | १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले. |
२२ ऑगस्ट | मद्रास दिन १९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते. |
२३ ऑगस्ट | आंतरराष्ट्रीय गुलामगीरी निर्मूलन दिन |
२४ ऑगस्ट | आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन १६९०: कोलकाता शहराची स्थापना. १९६६: विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. |
२५. ऑगस्ट | १९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली. |
२६ ऑगस्ट | १९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. |
२७ ऑगस्ट | १९७२: वन्यजीव संरक्षण कायदा संमत. |
२८ ऑगस्ट | १८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित. |
२९ ऑगस्ट | आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन भारतीय क्रीडा दिन तेलगू भाषा दिन १९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले. १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली. २०१३: राष्ट्रीय क्रीडा दिन |
३० ऑगस्ट | १५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले. |
३१ ऑगस्ट | बाल स्वातंत्र्य दिन १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात. १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली. |
सप्टेंबर महिना दिनविशेष | September Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ सप्टेंबर | राष्ट्रीय शिक्षक दिन , आंतरराष्ट्रीय दान दिन १९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली. १९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना. १९६१: NCERT स्थापना |
२ सप्टेंबर | १९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना. १९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली. १९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली. |
३ सप्टेंबर | १९१६: श्रीमती ऍनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली. |
४ सप्टेंबर | २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला. |
५ .सप्टेंबर | १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले. २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. |
६ सप्टेंबर | १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली. १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड. |
७ सप्टेंबर | १९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश. |
८ सप्टेंबर | साक्षरता दिन जागतिक शारीरिक उपचार दिन २०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात. |
९ सप्टेंबर | हुतात्मा शिरीषकुमार दिन २०१२: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले. |
१० सप्टेंबर | जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिन १९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली. |
११ सप्टेंबर | १९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला. १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले. १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले. |
१२ सप्टेंबर | १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. |
१३ सप्टेंबर | २००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. २००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. |
१४ सप्टेंबर | हिंदी दिन |
१५ सप्टेंबर | आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन राष्ट्रीय अभियंता दिन १९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले. १९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा. २०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली. |
१६ सप्टेंबर | आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस १९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली. |
१७ सप्टेंबर | मराठवाडा मुक्ती दिन १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. |
१८ सप्टेंबर | १९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना. १९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू. १९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना. १९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर. |
१९ सप्टेंबर | २००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर. |
२० सप्टेंबर | १९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले. |
२१ सप्टेंबर | आंतरराष्ट्रीय शांतता दिन |
२२ सप्टेंबर | १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर. |
२३ सप्टेंबर | १८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली. |
२४ सप्टेंबर | १८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना. |
२५ सप्टेंबर | १९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. १९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर. |
२६ सप्टेंबर | २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड. |
२७ सप्टेंबर | जागतिक पर्यटन दिन |
२८ सप्टेंबर | जागतिक रेबीज दिन ,आंतरराष्ट्रीय RTI दिन १९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. |
२९ सप्टेंबर | जागतिक हृदय दिन २०१२: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले. |
३० सप्टेंबर | आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला. |
ऑक्टोबर महिना दिनविशेष | October Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय कॉफी दिन आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन आंतरराष्ट्रीय संगीत दिन १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले. |
२ ऑक्टोबर | महात्मा गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन बाल सुरक्षा दिन १९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली. |
३ ऑक्टोबर | १६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली. |
४ ऑक्टोबर | राष्ट्रीय एकता दिन जागतिक प्राणी दिन |
५ ऑक्टोबर | जागतिक शिक्षक दिन आंतरराष्ट्रीय वैश्या व्यवसाय विरोधी दिन १९४८: IUCN स्थापना १९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर. |
६ ऑक्टोबर | १९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले. १९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. |
७ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जतंतू वेदना जागृकता दिन १९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले. |
८ ऑक्टोबर | भारतीय वायुसेना दिन १९७२: वन्यजीव सप्ताह |
९ ऑक्टोबर | जागतिक पोस्ट दिन १९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. |
१० ऑक्टोबर | जागतिक मानसिक आरोग्य दिन जागतिक लापशी दिन जागतिक मृत्युदंड विरोधी दिन १९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. |
११ ऑक्टोबर | २००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर. |
१२ ऑक्टोबर | १९९३: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना. |
१३ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय नेसर्गिक आपत्ती निवारण दिन १९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. |
१४ ऑक्टोबर | जागतिक मानक दिन १९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर. |
१५ ऑक्टोबर | जागतिक विद्यार्थी दिन , जागतिक हॅन्ड वॉश दिन १८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली. १९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान. |
१६ ऑक्टोबर | जागतिक भूलतज्ञ दिन जागतिक अन्न दिन १९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला. १९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान. |
१७ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन १९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर. १९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर. |
१८ ऑक्टोबर | जागतिक राजेनिवृत्ती दिन १९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना. १९१९: राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला. |
१९ ऑक्टोबर | १९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर. |
२० ऑक्टोबर | १९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली. १९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर. |
२१ ऑक्टोबर | भारतीय पोलीस स्मृतिदिन १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना. |
२२ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन , आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन १९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले. २००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले. |
२३ ऑक्टोबर | १८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला. १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान. |
२४ ऑक्टोबर | सयुंक्त राष्ट्र दिन जागतिक विकास माहिती दिन जागतिक पोलिओ दिन १९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली. १९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली. |
२५ ऑक्टोबर | १९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. |
२६ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय इंतेरसेप्ट जागरूकता दिन १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले. १९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला. |
२७ ऑक्टोबर | जागतिक ऑडिओ व्हिजुअल वारसा दिन १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले. |
२८ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन १९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले. |
२९ ऑक्टोबर | जागतिक स्ट्रोक दिन १८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना. १९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली. |
३० ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय आर्थोपेडिक परिचारिका दिन १९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. १९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले. |
३१ ऑक्टोबर | जागतिक बचत दिन राष्ट्रीय एकता दिन १९६६: दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली. १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. |
नोव्हेंबर महिना दिनविशेष | November Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ नोव्हेंबर | जागतिक शाकाहार दिन १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला. १९५६: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. १९५६: केरळ राज्य स्थापना दिन. १९५६: द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती |
२ नोव्हेंबर | भारतीय आगमन दिन |
३ नोव्हेंबर | १९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा. २०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले. |
४ नोव्हेंबर | १८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना. १९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला. २००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. |
५ नोव्हेंबर | मराठी रंगभूमी दिन २०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली. |
६ नोव्हेंबर | १८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला. १९१२: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले. |
७ नोव्हेंबर | १८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली. |
८ नोव्हेंबर | जागतिक शहरीकारण दिन अंतराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन २०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९४७: पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना. |
९ नोव्हेंबर | धन्वंतरी दिन कायदाविषयक सेवा दिन १९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले. २०००: उत्तराखंड राज्याची निर्मिती. |
१० नोव्हेंबर | जागतिक विज्ञान दिन १९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले. १९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली. |
११ नोव्हेंबर | राष्ट्रीय शिक्षण दिन १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. |
१२ नोव्हेंबर | जागतिक न्यूमोनिया दिन २०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. |
१३ नोव्हेंबर | जागतिक दयाळूपणा दिन १९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले. |
१४ नोव्हेंबर | जागतिक मधुमेह दिन राष्ट्रीय बालदिन १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना. |
१५. नोव्हेंबर | १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी. २०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले. |
१६ नोव्हेंबर | अंतराष्ट्रीय सहनशीलता दिन १८९३: डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन. १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली. १९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले. |
१७ नोव्हेंबर | जागतिक पूर्वपरिपक्वता दिन अंतराष्ट्रीय विद्यार्थी दिन १९३२: तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर. |
१८ नोव्हेंबर | १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली. २०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले. |
१९ नोव्हेंबर | जागतिक शौचालय दिन अंतराष्ट्रीय पुरुष दिन महिला उद्योजकाटा दिन १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना. २०१३: राष्ट्रीय एकत्मता दिन. |
२० नोव्हेंबर | अंतराष्ट्रीय बालदिन १९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित. १९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली. |
२१ नोव्हेंबर | जागतिक टेलिव्हिजन दिन १९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला. |
२२ नोव्हेंबर | १९६५: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली. |
२३ नोव्हेंबर | १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. |
२४ नोव्हेंबर | उत्क्रांती दिन १८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना. १९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले. |
२५ नोव्हेंबर | अंतराष्ट्रीय महिलांविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन १९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना. १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर. |
२६ नोव्हेंबर | अंतराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन १९४९: भारताची घटना मंजूर झाली. १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. २००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला. १९४९: संविधान दिन. |
२७ नोव्हेंबर | २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला. |
२८ नोव्हेंबर | १९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.= |
२९ नोव्हेंबर | १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर. |
३० नोव्हेंबर | १९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. |
डिसेंबर महिना दिनविशेष | December Dinvishesh
तारीख | दिनविशेष | Dinvishesh |
१ डिसेंबर | एड्स प्रतिबंधक दिन १९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली. १९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य झाले. १९६५: भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली. १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली. |
२ डिसेंबर | जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन १९८४: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. |
३ डिसेंबर | जागतिक अपंग दिन भोपाळ वायुगळती दिन १९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २०१५: सुगम्य भारत अभियान. |
४ डिसेंबर | भारतीय नौसेना दिन १९२४: गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन. |
५ डिसेंबर | जागतिक माती दिन १९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना. |
६ डिसेंबर | २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. |
७ डिसेंबर | भारतीय लष्कर ध्वज दिन आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन १८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला. १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड. |
८ डिसेंबर | १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली. १९८५: सार्क परिषदेची स्थापना. १९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला. २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली. |
९ डिसेंबर | आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक. १९७५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ. |
१० डिसेंबर | मानवी हक्क दिन १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले. |
११ डिसेंबर | १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना. |
१२ डिसेंबर | स्वदेशी दिन हुतात्मा बाबू गेनू शाहिद दिन २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. |
१३ डिसेंबर | २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर. |
१४ डिसेंबर | १९५०: UNHCR ची स्थापना. |
१५ डिसेंबर | आंतरराष्ट्रीय चहा दिन १८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला. १९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला. |
१६ डिसेंबर | १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली. १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली. |
१७ डिसेंबर | १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. |
१८ डिसेंबर | आंतरराष्ट्रीय स्थलांतरिणत दिन २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या. |
१९ डिसेंबर | गोवा मुक्ती दिन १९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले. |
२० डिसेंबर | आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन १९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू. १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान. |
२१ डिसेंबर | १९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला. १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. |
२२ डिसेंबर | राष्ट्रीय गणित दिन १८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली. १९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले. |
२३ डिसेंबर | किसान दिन २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे. |
२४ डिसेंबर | २०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले. १९८६: भारतीय ग्राहक दिन. |
२५ डिसेंबर | चांगले शासन दिन नाताळ १९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील. १९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी. |
२६ डिसेंबर | १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार. |
२७ डिसेंबर | १९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले. |
२८ डिसेंबर | १८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला. १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला. |
२९ डिसेंबर | १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला. |
३० डिसेंबर | १९०६: मुस्लिम लिगची स्थापना. |
३१ डिसेंबर | १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. |
No comments:
Post a Comment