ज्ञानरचनावाद
प्रस्तावना
शिक्षण क्षेत्रात ज्ञानरचनावाद शब्द वारंवार वापरला जातो. या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावतअसतो. काही म्हणतात शाळेत साधने वापरून कृतियुक्त शिक्षण देणे. तर काही रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्हीसांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिले. काहीजण वर्तनवाद विरुद्ध रचनावाद अशी मांडणी करतात.
रचनावादपूर्वीचे शिकण्याबाबतचे सिद्धांत खालीलप्रमाणे.
रचनावादपूर्वीचे शिकण्याबाबतचे सिद्धांत खालीलप्रमाणे.
कोरी पाटी सिद्धांत
मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू (मूल म्हणजे मातीचा गोळा) असा सिद्धांत. बाहेरच्या जगाचेप्रतिबिंब मुलाच्या रिकाम्या मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येकमुलाला आपल्याला हवे ते, हवे तसे, हवे तेव्हा शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाचशिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्या पाट्या असत्या तर मुलांच्याशिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही
वर्तनवाद सिद्धांत
मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्याअस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्याआधारे बांधतो. (उदा. नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण तो तोंड पाडून बसलाय, बोलत नाहीये असे त्याचे वर्तनपाहून बांधतो.) कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.त्यामुळे मग वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्रअशी व्याख्या केली जाऊ लागली.
वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचेवर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणिशिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करतनाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणेम्हणजे शिकणे अशी शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली.
वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिलस्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणेप्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले. मूलमातृभाषा कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला. माणसाची भाषा ही एक अत्यंतगुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे. जगातल्या खर्या वस्तू, क्रिया, भावना, वस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनीआपण दाखवत असतो. भाषेतील शब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करूशकतो. मातृभाषेचे नियम, व्याकरण, जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकते, भाषा वापरून आपणविचार कसा करू शकतो, याचे उत्तर वर्तनवादी सिद्धांताला देता येईना.
आकलनवाद
वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असत. कारण विचार-प्रक्रिया अभ्यासायचीतर मनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवातझाली होती! या प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेले. मूल भाषा कशी शिकते, हे केवळ अभिसंधानप्रक्रिया वापरून स्पष्ट करणे अशक्य आहे अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केली. माणसाचीविचारप्रक्रिया म्हणजे वर्तन नाही, तर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतो. विचार- प्रक्रिया ही मानसिक पातळीवरचालणारी क्रिया असल्याने, आकलनवादासोबत मानसिक-अवस्था व मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासातपरत स्थान मिळाले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाही, मात्र तोशिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यास तोकडा आहे, असे सप्रमाण दाखवून दिले आहे.
ज्ञानरचनावाद
ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर या शास्त्रज्ञानी विचार मांडलेलेआहेत.नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचाआपल्या पूर्वानुभवाच्या आधारे अर्थ लावून समजवून घेणे, याभूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे . हा मुलांच्याशिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे.
फ्रान्सचे जिन पियाजे Jean Piage यांनी ज्ञानसंरचनावादाचीसंकल्पना मुलांच्या वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या त्यांच्याआकलनशक्तीशी जोडली. त्यांनी मुलाच्या जन्मापासून ते पंधरावर्षांपर्यंत चार गट केले आहेत. या प्रत्येक गटात मुलांच्या विविध आकलनशक्तीचा विकास होत जातो. बालकांच्या वृध्दिंगतहोणाऱ्या या गुणांचा आपल्या अनुभव आहे. जन्मापासून आपल्या देहबोलीतून, कृतीतून, बोलण्यातून प्रत्येक बालकआपल्याला त्याच्या वाढत्या ज्ञानसंरचनेची चुणूक दाखवतो.
लेव वायगोस्कीच्या संकल्पनेप्रमाणे बालकांवर त्याचे आजूबाजूची परिस्थिती, परिसर,संस्कृती, शिक्षक आणि मुख्य म्हणजेत्याच्या मित्रपरिवाराचा मोठा प्रभाव पडत असतो. वेळेनुसार या सर्वाना तो स्वत:च्या अनुभवाची जोड देऊन स्वत:चीज्ञानाची रचना करीत असतो. याचे उत्तम उदाहरण द्यायचे म्हटले तर शहरातील मुले लहान वयातच रिमोट कंट्रोल,मोबाइल आणि आता संगणक आपणहून शिकतात. त्यांना हे कोणी वेगळे शिकवण्याची गरज लागत नाही. त्याच वेळीग्रामीण भागातला मुलगा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे जंगलाची, शेतीची अथवा वंशपरंपरागत इतरकौशल्याच्या गोष्टी शिकत असतो. या त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत आजूबाजूची नैसर्गिक आणि सामाजिक परिस्थिती,संस्कृती यांचा प्रभाव पडत असतो. मुलांच्या संरचनेत त्यांच्या मित्रपरिवाराचा प्रभाव निश्चितच पडतो. घरापासून तेशाळेपर्यंत जाण्यायेण्याच्या प्रवासात मुले जे ज्ञान शिकतात ते शाळेच्या कुठल्याही अभ्यासक्रमात वा पाठय़पुस्तकातनसते. मुलांच्या विश्वात विविध प्रकारच्या ज्ञानाची सतत देवाणघेवाण होत असते. हल्लीच्या काळात दूरदर्शन वाहिन्या,नेटसर्फिग, फेसबुकसारख्या मनोरंजक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुले प्रचंड माहिती मिळवत असतात आणिआपापल्या परीने प्रत्येकजण स्वत:ची ज्ञानसंरचना करीत असतो.
मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्याज्ञानाची रचना करतो हा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजूनघेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे, तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपडआहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गतीमिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्यानेबनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेलेउदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्याज्ञानाची रचना करतो हा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजूनघेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे, तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपडआहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गतीमिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्यानेबनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेलेउदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
1. सुरुवातीला बाबा या शब्दाचा अर्थ पुरुष या शब्दासारखाच असतो. त्यामुळे सर्व पुरुषांसारख्या दिसणा-या व्यक्तींना मूलबाबा म्हणते.
2. हळू हळू त्यातून आजोबा, दादा असे वयानुसार पडणारे काही गट वेगळे होतात. मग त्या त्या वयोगटातील व्यक्तींना मूलदादा वा आजोबा म्हणू लागते. या टप्प्यावर पुरुष या धारणेत किमान आजोबा, बाबा व दादा असे तीन गट आहेत.
3. काका, मामा अशी नाती लक्षात येऊ लागली म्हणजे मुलाची पुरुष या गटाची धारणा अधिक विस्तारते.
4. हळू हळू वाढत्या अनुभवाबरोबर पुरुष या शब्दाची मोठ्या माणसांच्या धारणेसारखी धारणा मूल बनवते.
ज्ञानरचनावादाचे पैलू
१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. यासाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.
२. हाताने करून शिकणे हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.
३. मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगतविचाराला आदराचे स्थान आहे.
४. मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर कायआणि कशी मदत करावी याचे भान शिकवणा-या माणसाला असावे लागते.
1. पिंज-यात बंद असणार्या एखाद्या उंदराला कळ दाबल्यावर अन्न मिळते हे अपघाताने समजले, तर तो हवे तेव्हा कळदाबून अन्न मिळवायला शिकतो. कळ दाबणे हे वर्तन अन्नाच्या बक्षिसामुळे उंदीर पुन्हा पुन्हा करतो. काही काळाने जरवारंवार कळ दाबून अन्न मिळाले नाही तर तो कळ दाबणे बंद करतो. कळ दाबणे आणि अन्न मिळणे यात जो संबंध जोडलाजातो त्याला अभिसंधान किंवा Conditioning असे म्हणतात.वर्तनवाद्यांच्या मते अभिसंधान ही शिकण्यातील प्रमुखप्रक्रिया आहे.
2. तीन वर्षांच्या आयुषचे हे वाक्य पाहा - ‘इथे झुरळ मरले आहे बघ.’ या क्रियापदाचे ‘मरले’ असे भूतकाळातील रूप केलेआहे. अर्थातच त्याच्या आसपासचे कोणीच हे रूप वापरत नाही. सगळेजण ‘झुरळ मेले’ असे रूपच वापरतात. मात्र लहानग्याआयुषच्या मनात मराठीचे व्याकरण आकार घेते आहे, त्यामुळे त्याने बसले, उठले यासारखे मरले असे रूप बनवले आहे.कोणीही कधीही न वापरलेले हे क्रियापदाचे रूप आयुषला कसे सुचले याचे स्पष्टीकरण वर्तनवादी सिद्धांताच्या आधारे देतायेत नाही.
3. सहावीच्या वर्गात गुरुजींनी ऋण संख्या शिकवल्या, पूर्णांक संख्यांची बेरीज-वजाबाकी शिकवली आणि मुलांना उदाहरणेसोडवायला दिली. त्यांना असे दिसले की बर्याच जणांचा ऋण संख्यांच्या बेरीज-वजाबाकीत तर गोंधळ उडालाच, पण गंमतम्हणजे ४-३ = ? यासारख्या उदाहरणातही मुलांनी चुका केल्या होत्या. इयत्ता सहावीत येईपर्यंत सहजपणे येणार्यावजाबाकीत मुलांनी का चुका केल्या ? आतापर्यंत नैसर्गिक संख्याच्या आधारे वजाबाकीची जी धारणा मुलांनी बनवली होतीती पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीच्या नियमांमुळे मोडून पडली आणि त्यामुळे आता वजाबाकीची नवीन धारणा बनेपर्यंतमुलांचा स्वाभाविकपणेच गोंधळ झाला. ही नवी धारणा बनेपर्यंत मुलांना वेळ द्यायला हवा असे ज्ञानरचनावादावर विश्वासअसणारा शिक्षक़ म्हणेल.
4. एखादे मूल अपूर्णांक शिकते आहे. अपूर्णांकांची मूलभूत कल्पना (आकृती पाहून अपूर्णांक लिहिणे वगैरे), अपूर्णांकाचेवाचन, लेखन या बाबी त्याला स्वतंत्रपणे येत असल्या तरी दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवायला त्याला लगेचजमेल असे नाही. काही दिवस निरनिराळ्या अपूर्णांकांच्या जोड्यांवर शिक्षकांच्या मदतीने, शैक्षणिक साधने वापरून काम केलेम्हणजे मग लहान-मोठेपणा ठरवणे मुलांना शक्य होऊ लागते.
ज्ञानरचनावादाची तत्वे
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF2005), बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधीनियम 2009 (RTE )मधील कलम २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात.d
1.ज्ञान हे स्थिती शील Static नसून गतिशील Dynamic आहे
2.मनुष्य स्वतः शिकत असतो, आपल्या ज्ञानाची रचना करत असतो
3.पूर्वानुभवाच्या आधारे मनुष्य ज्ञान रचना करतो
4.सामाजिक, भाषिक व सांस्कृतिक आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते
5.स्थानिक परिस्थितीचा / परिसराचा मोठा वाट ज्ञान रचनेत असतो
ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन
पूर्वज्ञान - शिकवण्याची प्रक्रिया हि सतत चालणारी प्रक्रियाआहे. त्यानुसार या संज्ञेचा अर्थ बालक विशिष्ट नवीन घटकशिकण्यापूर्वी त्या घटका संदर्भातील त्याची आधीची समज असा घेता येईल. वर्गातील प्रक्रियेत शिक्षकाला मुलाच्यापूर्वज्ञानाचा विचार करून अध्ययन – अनुभवाची निवड व रचनाकरावी लागेल .
शिकण्याची तयारी - शिकणाऱ्यांची शिकण्याची तयारीकरण्यासाठी त्याची शिकण्याची इच्छा व त्याची पात्रता यादोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना त्याची भावनिक अवस्था कशा प्रकारची आहे हेही महत्त्वाचे ठरते.भावनिक स्थिरतेतून भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी बालकांची मन: स्थिती हि शिकण्यासाठी योग्य स्थिती असते .
अध्ययन अनुभव - बालकाला ज्या अनुभावाद्वारे नवीन ज्ञान प्राप्त होणर असते तो अध्ययन-अनुभव; म्हणजे जोअनुभव आजवर त्याने घेतलेला नव्हता असा अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे. अध्ययन-अनुभव जितके संख्येने जास्त,विषयाला/आशयाला सुसंगत व समर्पक असावेत.असे अध्ययन-अनुभव विचारपूर्वक विद्यार्थांना पुरवणे शिक्षकाची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान,त्यांची शिकण्याची तयारी आणि अध्ययन-अनुभव यांचा योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेल. वर्गामध्ये शिक्षक जे सांगतील तसेच विध्यार्थी करतात .शिक्षक बोलताततेच विध्यार्थी ऐकतात.जोडवर्ग,मोठे वर्ग,विषयांची संख्या,वेगवेगळया चाचण्या, जोडीला एखादे दुसरे अशैक्षणिक काम यापरिस्थितीमध्ये वेळेत “पोर्शन “ संपवायची कसरत शिक्षक करत असतो.या प्रक्रियेत मुलांना किती समजले,त्यांना कायवाटते,कोणती गोष्ट त्यांना कठीण जाते, त्यांना काही अडले आहे का, यांसारख्या गोष्टीना वेळच मिळत नाही किंवादिला जात नाही.लहान मुले उपजतच बहुविध क्षमतेची असतात.ती त्यांच्या अंगभूत क्षमंतानुसार व गतीनुसारशिकतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानाच उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्यालाशिकवलेले हे धडे वर्गावर्गात मात्र दूर्लक्षिले जातात .शालामंध्ये बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती,फलक लेखन,पाठांतर,सराव.गृहपाठ या चाकोरीतून जाणे शिक्षकांना व त्याची सवय झालेल्या विद्यार्थी, पालक यांना सोयीचे जाते.अशा पदधतीने अनेक वर्ष शिक्षणाची प्रकिया पार पडत आहे.परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात का? शिकत नसतील,तर तो विद्यार्थ्यांचा क्षमतेचा, बुद्धीचा किवा शिक्षकांच्या कौशल्याचा दोष मानला जातो,परंतु हे कितपत खरे आहे? दोष असेल तर तो शिकवणे या पूर्वापार चालत आलेल्या संकल्पनेचा दोष आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.म्हणूनच आपण शिकवणे यावर लक्ष काढून घेऊन ते शिकणे यावर केंद्रित केले पाहिजे.ज्ञानरचानावाद हि हेच सांगतो.
No comments:
Post a Comment