विद्यार्थी विमा
शासन बऱ्याच कल्याणकारी योजना राबवित असते. त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना आहे. या योजनेची सुरुवात 26 ऑक्टोबर 2012 पासून करण्यात आली. राज्यातील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या उद्देश्याने या योजनेची सुरुवात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
सुरवातीला हि योजना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना या नावाने विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत होती. व या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विम्याचे हफ्ते राज्य शासनाकडून अदा करण्यात येत होते. परंतु शासनाच्या असे लक्षात आले कि सदर विमा कंपनी विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना अपघाताच्या दाव्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत तसेच रक्कम देण्यास उशीर देखील लावत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने हि योजना विमा कंपन्यांमार्फत बंद केली व सदर योजना सानुग्रह अनुदान योजना या नावाने राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
राज्यातील बहुतांश परिवार हे दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन जगत आहेत. तसेच त्यांचा रोजगार स्थायी स्वरूपाचा नसल्याकारणामुळे ते आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना विम्याचे महत्व माहित असून सुद्धा विम्याच्या हफ्त्याची रक्कम भरता येत नसल्यामुळे ते आपल्या मुलांचा विमा करण्यास असमर्थ असतात. त्यामुळे मुलांचा अपघात झाल्यास उपचारासाठी त्यांच्याजवळ पुरेसा पैसे नसतो त्यामुळे त्यांना आपल्या मुलांच्या उपचारासाठी खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. साहुकारांकडून जास्त व्याजावर कर्ज घ्यावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांना विमा संरक्षण निर्माण करून देणे.
वाचकांना विनंती
आम्ही राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील जे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना |
विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत चे विद्यार्थी |
लाभ | आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना उद्दिष्ट्य
Rajiv Gandhi Student Accident Insurance Scheme Purpose
- इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचे संरक्षण देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टय आहे.
- वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुशंघाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- मुलांच्या अपघाताच्या वेळी पालकांचा होणाऱ्या आर्थिक समस्येपासून मुक्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना वैशिष्ट्य
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana
- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.
- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी कोणत्याची जाती धर्माची अट नाही आहे.
- इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक विमा योजना आहे.
- या योजनेद्वारे राज्यातील पालकांना तसेच विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
- या योजनेअंतर्गत विम्याच्या हफ्त्याची रक्कम राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येईल.
- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राज्यातील मुले आणि मुली दोघांसाठी सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास पालकांना उपचारासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि कोणाकडून कर्ज घ्यायची आवश्यकता भासणार नाही.
- योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत मिळणारे अनुदान
1. विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
सानुग्रह अनुदानाची रक्कम: 1.50 लाख रुपये
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
1. प्रथम खबरदारी अहवाल
2. स्थळ पंचनामा
3. इन्व्हेस्ट पंचनामा
4. सिव्हिल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला (सिव्हिल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)
2. अपघातामुळे कायमचे अपंगत्व (2 अवयव / दोन डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा निकामी)
सानुग्रह अनुदानाची रक्कम: 1 लाख रुपये
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
3. अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव किंवा 1 डोळा कायम निकामी)
सानुग्रह अनुदानाची रक्कम: 75,000/- रुपये
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
4. विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास
सानुग्रह अनुदानाची रक्कम: प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीती जास्त 1 लाख रुपये
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
शास्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
5. विद्यार्थी आजारी पडून,सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास
सानुग्रह अनुदानाची रक्कम: 1.50 लाख रुपये
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
सिव्हिल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला
6. विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे जखमी झाल्यास (क्रीडा स्पर्धेंत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून)
सानुग्रह अनुदानाची रक्कम: प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीती जास्त 1 लाख रुपये
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
हॉस्पिटल चे उपचाराबाबतचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्रमाणे प्राधान्य क्रमानुसार अदा करण्यात येईल
- विद्यार्थ्यांची आई
- विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास वडील
- आई व वडील दोघे हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत समाविष्ट नसलेले अपघात
Rajiv Gandhi Vidyarthi Apaghat Sanugrah Anudan Yojana Marathi
- आत्महत्येचा प्रयत्न करणे व त्यामुळे झालेली इजा
- आत्महत्या करणे
- जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे
- गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
- अमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात
- नैसर्गिक मृत्यू
- मोटार शर्यतीत झालेला अपघात/मृत्यू
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची कार्यपद्धती
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Marathi
या योजनेअंतर्गत प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रयेक जिल्ह्यात जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.या समिती समोर इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी व इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची असेल.मात्र बृहन्मुंबई शहराकरिता संबंधित शिक्षण निरीक्षक हे प्रस्तावाची छाननी करतील आणि समितीसमोर सादर करतील.
समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावाची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत एकाच हफ्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/गट शिक्षण अधिकारी/शिक्षण निरीक्षक यांची असणार आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Eligibility
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे लाभार्थी
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Scheme Maharashtra
- इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकत असलेले सर्व विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अटी
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Terms & Condition
- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्याच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- विद्यार्थ्यांने मधीच शिक्षण सोडल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी या आधी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्या विमा योजनेचा लाभ घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थ्यांचे आई वडील किंवा दोघांपैकी एक सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास त्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Documents
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जन्माचा दाखला (शाळेचा दाखला)
- पासपोर्ट साईज फोटो
- बँकेचा तपशील
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
Rajiv Gandhi Vidyarthi Apaghat Anudan Yojana Application Process
- अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जाऊन राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
- व भरलेला अर्ज आपल्या शाळेच्या कार्यालयात जमा करायचा आहे आणि त्या अर्जाची पोचपावती घ्यायची आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दावा अर्ज करण्याची पद्धत
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana Claim Process
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन या योजनेचा दावा अर्ज घायचा आहे आम्ही खाली दावा अर्ज दिला आहे तो Download कार्याचा आहे.
- दावा अर्जात विचारलेली सर्व माहित भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून हा अर्ज त्याचा कार्यालयात जमा करायचा आहे.
- अर्जाची छाननी करून लाभाची रक्कम पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे फायदे काय आहेत?
एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचे आणि विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
सारांश
आशा करतो कि राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
धन्यवाद !